Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Leviticus Chapters

Leviticus 23 Verses

Bible Versions

Books

Leviticus Chapters

Leviticus 23 Verses

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “इस्राएल लोकांना असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्र सण असे.
3 “सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
4 “परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
6 “त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर-खमीर न घातलेली भाकर खावी.
7 सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी काही काम करु नये:”
9 परमेश्वर मोशेला म्हणाला,
10 “इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
11 याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी स्वीकारण्यात येईल.
12 “पेंढी ओवाळाल त्या दिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे;
13 तुम्ही त्याच बरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश मैद्याच्या पिठाचे अन्नार्पण अर्पावे. त्याच्या सुवासाने परमेश्वराला संतोष होतो; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थाश हिन द्राक्षारस अर्पावा.
14 तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.
15 “तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-रविवारी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;
16 सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या रविवारी म्हणजे पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.
17 त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळाण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
18 “एक गोऱ्हा, दोन मेंढे व एक एक वर्षाची सात नर कोंकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वराला संतोष होईल.
19 आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी एक एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावेत.
20 “याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
21 त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हाला पिढ्यान्पिढ्या निंरंतरचा नियम होय.
22 “तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचूं नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
23 आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला,
24 “इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
25 तुम्ही कोणतही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वराला अर्पण अर्पावे.”
26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करुन नम्र व्हावे व परमेश्वराला अर्पण अर्पावे.
28 त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवश आहे; त्या दिवशी तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
29 “त्या दिवशी जो माणूस काही न खाता आपल्या जिवास दंडन करुन आपणाला नम्र करणार नाही त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30 त्या दिवशी कोणाही माणसाने जर कसलेही काम केले तर मी देव त्याला त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहात असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हाला हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय.
32 तो दिवस तुम्हाला पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास दंडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करुन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
33 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
34 “इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही काम करु नये.
36 सात दिवस परमेश्वराला अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वराला अर्पण अर्पावे; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
37 “परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्या दिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यांत योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वराला अर्पावे.
38 परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वराला अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
39 “जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवस पर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.
40 पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन परमेश्वरासमोर सात दिवस उत्सव करावा.
41 प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
42 तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात राहावे,
43 म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
44 तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांना कळवले.

Leviticus 23:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×