Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

John Chapters

John 13 Verses

Bible Versions

Books

John Chapters

John 13 Verses

1 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आलाआहे, हे जाणून आपले स्वत:चे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.
2 मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना,
3 आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून,
4 येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला.
5 मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.
6 मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, ‘प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”
7 येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”
8 पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.” 8 शिमोन पेत्राने उत्तर दिले,
9 “मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”
10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.”
11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.
12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यावस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय?’
13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे.
14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे.
15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले.
16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही.
17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.
18 “मी तुम्हां सर्वाविषयी बोलत नाही. ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत.” परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे: ‘जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.’
19 हे होण्याअगोदरच मी तुम्हांस सांगतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा, की मी तो आहे.
20 मी तुम्हांस खरे सांगतो ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.”
21 असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”
22 तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
23 आणि ज्याच्यावर येशू प्रीति करीत असे असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्याजवळ खेटून बसला होता.
24 शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावले आणि म्हणाला, “ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे विचार.”
25 तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याल म्हणाला, “प्रभु तो कोण आहे?”
26 येशूने उत्तर दिले, “ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडवून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला.
27 त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे ते लवकर कर.”
28 पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही.
29 कारण यहूदाजवळ पैशाचा व्यवहार होता. काहींना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरिबाला काही देण्याविषयी सांगत आहे.
30 यहूदाने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला कारण ती वेळ रात्रीची होती.
31 तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे.
32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.
33 “माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.
34 ‘मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा.
35 तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”
36 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही. पण नंतर तू माझ्यामागे येशील.”
37 पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही?’ मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”
38 मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मलातीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

John 13:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×