Indian Language Bible Word Collections
Job 16:14
Job Chapters
Job 16 Verses
Books
Old Testament
New Testament
Bible Versions
English
Tamil
Hebrew
Greek
Malayalam
Hindi
Telugu
Kannada
Gujarati
Punjabi
Urdu
Bengali
Oriya
Marathi
Assamese
Books
Old Testament
New Testament
Job Chapters
Job 16 Verses
1
नंतर ईयोबने उत्तर दिले,
2
“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत. तुम्ही तिघे जण मला त्रास देता, आराम नव्हे.
3
तुमची लांबलचक भाषणे कधीही संपत नाहीत. तुम्ही वाद घालणे का सुरु ठेवले आहे?
4
जर तुमच्यावर माझ्यासारखे संकट आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
5
पण मी तुम्हाला धीर देऊ शकलो असतो आणि माझ्या बोलण्याने तुमच्यात आशा निर्माण केली असती.
6
“परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाही तर मला शांती लाभत नाही.
7
देवा, खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
8
तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांना वाटते.
9
“देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
10
लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
11
देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर माणसांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
12
मी अगदी मजेत होतो. पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले. त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
13
त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या मुत्रपिंडात बाण सोडतो. तो दया दाखवीत नाही. तो माझे मूत्राशय धरतीवर रिकामे करतो.
14
देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. युध्दातल्या सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करुन येतो.
15
“मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
16
रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आहेत.
17
मी कुणाशीही दुष्टपणाने वागलो नाही. तरीही माझ्या बाबतीत या वाईट गोष्टी घडल्या. माझ्या प्रार्थना नेहमी बरोबर आणि शुध्द असतात.
18
“हे धरतीमाते, माझ्यावर जे जुलूम झाले आहेत ते लपवू नकोस. मी न्यायासाठी भीक मागतो आहे ते थांबवू नकोस.
19
स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. कदाचित् मला पाठिंबा देणारा आणि माझा बचाव करणारा कुणी तिथे असेल.
20
माझा मित्र माझ्यासाठी बोलतो. पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
21
जशी एखादी व्यक्ति आपंल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.
22
“मी अगदी थोड्या वर्षातच पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे (मृत्युलोक).