Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Hosea Chapters

Hosea 3 Verses

Bible Versions

Books

Hosea Chapters

Hosea 3 Verses

1 मग परमेश्वर पुन्हा मला म्हणाला, “गोमरला खूप प्रियकर आहेत पण तू तिच्यावर प्रेम करीत राहिलेच पाहिजे. का? कारण परमेश्वर तसेच करतो. परमेश्वर इस्राएल लोकांवर सतत प्रेम करतो, पण ते लोक मात्र इतर दैवतांची पूजा करीत राहतात. त्यांना मनुकांच्या ढेपा खाणे आवडते.”
2 म्हणून मी सहा औस चांदी व 9 बुशेल जव देऊन गोमरला विकत घेतले.
3 मग मी तिला म्हणालो, “खूप दिवस तू माझ्याबरोबर घरात राहिले पाहिजेस. तू वेश्येप्रमाणे वागता कामा नयेस. तू दुसऱ्या पुरुषाबरोबर जाणार नाहीस. मीच तुझा पती असेन.”
4 ह्याचप्रमाणे, पुष्कळ दिवस इस्राएली लोकांना राजावाचून वा नेत्यावाचून काळ कंठावा लागेल. त्यांना बळी, स्मृतिशिळा, एफोद वा घराण्याचा देव यांच्यावाचून राहावे लागेल.
5 ह्यानंतर इस्राएलचे लोक परत येतील. मग ते परमेश्वराला म्हणजेच त्यांच्या देवाला आणि दीवीदाला म्हणजेच त्यांच्या राजाला शोधतील. शेवटच्या दिवसांत, ते परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आदर करतील.

Hosea 3 Verses

Hosea 3 Chapter Verses Marathi Language Bible Words display

COMING SOON ...

×

Alert

×