कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरुप नव्हे, म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही.
जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते.
पहिल्याने तो म्हणाला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी व पापार्पणांनी संतोष वाटत नाही.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात रतीदेखील.)
म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंत:करणाने देवाच्या जवळ जाऊ.
आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवसजवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे.
तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.