अशा रीतीने इस्राएलाने मिसरच्या प्रवासास सुरवात केली. प्रथम तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाची उपासना केली व देवाला अर्पणे वाहिली.
जाताना मी तुझ्याबरोबर येईन, आणि तुझ्या संततीस मी मिसरमधून पुन्हा बाहेर आणीन; तू मिसरमध्ये मरण पावशील परंतु मरण्याच्या वेळी योसेफ तुझ्याजवळ असेल; तू मरण पावशील तेव्हा तो आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले.
(6-7) त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले. अशा रीतीने इस्राएल आपल्या कुटुंबातील सर्वांना म्हणजे आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्वांना घेऊन मिसरला गेला.
याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.
आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला.
मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांस म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत;
माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’
तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”