Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Galatians Chapters

Galatians 3 Verses

Bible Versions

Books

Galatians Chapters

Galatians 3 Verses

1 अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुनसांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?
2 मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दानेतुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत?
3 तुम्ही इतके मूर्ख आहात का की, जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरु केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात?
4 तुम्ही व्यर्थचइतकी दु:खे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती.
5 देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्येचमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.
6 ते, अब्राहामाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे: “त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्यासाठी देवाकडूननीतिमत्त्व असे गणण्यात आले.”
7 मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत.
8 पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामालापूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
9 म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्याअब्राहामासह आशीर्वाद मिळेल.
10 परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असेलिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापितअसो.”
11 नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की,“विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”
12 नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की, “जोकोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.”
13 ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शापहोऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.”
14 ख्रिस्तानेआम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.
15 बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवात्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे.
16 अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षातघ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते,“आणि तुइया संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे.
17 माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, देवाने अगोदर निश्चित केलेला करार चारशे तीस वर्षे उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता.
18 कारण वतन जर नियम शास्त्रावर अवलंबून होते, तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही. परंतु देवाने अभिवचनामुळे ब्राहामाला मुक्तपणे हे वतन दिले.
19 तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनालाजोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले.
20 आता मध्यस्थ हा फक्तएकाच पक्षाचा नसतो. पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत.
21 नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवनआणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल.
22 पण पवित्र शास्त्रानेस्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते तेजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.
23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांलाप्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते.
24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमानठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते.
25 पण आता हाविश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.
26 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वासठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात.
27 कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्तालापरिधान केले आहे.
28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वख्रिस्त येशूमध्ये एक आहात.
29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला

Galatians 3:8 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×