तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची नोकरी सोडू नका. जर तुम्ही शांत राहिलात आणि मदत केलीत तर तुम्ही तुमच्या घोडचुकाहीदुरुस्त करू शकाल.
जे लोक नोकर व्हायच्या लायकीचे असतात त्यांना घोडचावरून जाताना मी पाहिले आणि जे लोक राजे व्हायच्या योग्यतेचे होते त्यांना मूर्खाबरोबर गुलामासारखे जाताना मी पाहिले.
एखाद्याला सापावर ताबा कसा मिळवायचा ते माहीत असते. पण तो माणूस जवळपास नसताना कोणाला साप चावला तर त्या कौशल्याचा उपयोग नसतो. ते कौशल्य निरुपयोगी ठरते. शहाणपणही तसेच आहे.
राजा जर लहान मुलासारखा असला तर ते देशाच्या दृष्टीने फार वाईट असते. आणि जर राजे लोक आपला सर्व वेळ खाण्यात घालवत असतील तर तेही देशाच्या दृष्टीने वाईट असते.
पण राजा जर चांगल्या घराण्यातूनआलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.
राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.