Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

2 Kings Chapters

2 Kings 5 Verses

Bible Versions

Books

2 Kings Chapters

2 Kings 5 Verses

1 नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.
2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलमध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली.
3 ती नामानच्या बायकोला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलीशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करु शकेल.”
4 नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्राएलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले.
5 त्यावर राजा म्हणाला, “तू आत्ताच जा. इस्राएलच्या राज्यासाठी मी पत्र देतो.”तेव्हा नामान इस्राएलला निघाला. आपल्याबरोबर त्याने नजराणा घेतल्या. साडेसातशे पौंड चांदी, सहा हजार सुवर्णमुद्रा आणि दहा वस्त्रांचे जोड घेतले.
6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलच्या राजासाठी पत्रही घेतले. पत्रात म्हटले होते.” ... आणि पत्रास कारण की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.”
7 इस्राएलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा आपण दु:खी आणि हतबल झालो आहोत हे दाखवण्यासाठी त्याने आपले कपडे फाडून घेतले. तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे की काय? छे छे! जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. असे असताना अरामच्या राजाने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बर पाठवावे? तसा विचार केला तर यात काही तरी कारस्थान दिसते. अरामचा राजा काही तरी कुरबूर सुरु करायच्या विचारात आहे!”
8 राजाचे हे दु:खाने कपडे फाडणे आणि अस्वस्थ होणे संदेष्टा अलीशाच्या कानावर गेले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू कपडे का फाडलेस? (तू एवढा दु:खी का होतोस?) नामानला माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलमध्ये संदेष्टा असल्याचे त्याला कळेल.”
9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला.
10 अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”
11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील.
12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नरुा इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
13 पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले. “स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? ‘आंघोळ कर.’ त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले.”
14 तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.
15 नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलीशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, “इस्राएल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वीतलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”
16 पण अलीशा त्यांना म्हणाला, “मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही.”आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलीशाला परोपरीने विनवले पण अलीशाचा नकारच होता.
17 तेव्हा नामान म्हणाला, “माझ्या कडून तुम्ही भेट तर घेत नाहीच. मग एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी इस्राएलची माती नेण्याची मला मुभा द्यावी.म्हणजे मी यापुढे दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली अर्पण करणार नाही. फक्त परमेश्वरासाठीच यज्ञ करीन.
18 आणखी एका गोष्टीसाठी परमेश्वराने मला क्षमा करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. अरामचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या खोट्या दैवतांच्या पूजेला जातील. ते माझा आधार मागतील तेव्हा मला ही तिथे नमन करावे लागले असे झाले असता परमेश्वराने मला क्षमा करावी, माझी ही विनंती आहे.
19 तेव्हा अलीशाने नामानला निर्धास्तपणे जायला सांगून निरोप दिला.”मग नामान तिथून निघाला आणि थोडा पुढे गेला असेल तेवढ्यात
20 अलीशाचा नोकर गेहजी याला वाटले, “पाहा, माझ्या धन्याने या अरामच्या नामानला तसेच, त्याच्या कडून भेट न स्वीकारता जाऊ दिले. मीच आता धावत जाऊन त्याला गाठतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतो.”
21 आणि गेहजी नामानच्या मागे निघाला.नामानने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले. तेव्हा तो रथातून उतरला. त्याला गेहजी दिसला. नामान म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
22 गेहजी म्हणाला, “हो, तसे सगळे ठीक आहे. माझे स्वामी अलीशा यांनी मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांची दोन तरुण मुले आमच्याकडे आली आहेत. तेव्हा त्यांना पंचाहत्तर पौंड चांदी आणि दोन वस्त्रांचे जोड द्या.”‘
23 नामान म्हणाला, “जरुर, ही घ्या दीडशे पौंड चांदी.” नामानने गेहजीला ती चांदी घ्यायला लावली. नामानने ती दीडशे पौंड चांदी दोन थैल्यांमध्ये भरली आणि दोन वस्त्रांचे जोड घेतले. मग या वस्तू आपल्या दोन नोकरांच्या हवाली करुन गेहजीकडे त्या पोचवायला सांगितल्या.
24 डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. गेहजीने मग हा ऐवज आपल्या घरात लपवला.
25 गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कुठे गेला होतास?”गेहजी म्हणाला, “मी कुठेच गेलो नव्हतो.”
26 अलीशा त्याला म्हणाला, “हे खरे नव्हे, नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे ह्दय तुझ्यापाशीच होते. पैसाअडका, कपडेलत्ते जैतूनाची फळे, द्राक्षे, शेळ्या, गायी, किंवा दास दासी भेटी दाखल घेण्याची ही वेळ नव्हे.
27 नामानचा रोग आता तुला आणि तुझ्या मुलांना होईल. तुमच्यावर हे कोड सतत राहिल.”अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बफर्ासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.

2-Kings 5:2 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×