Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

2 Chronicles Chapters

2 Chronicles 35 Verses

Bible Versions

Books

2 Chronicles Chapters

2 Chronicles 35 Verses

1 राजा योशीयाने यरुशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
2 रमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
3 राएल लोकांना शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी शुचिर्भूत होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करारकोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
4 पापल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. राजा दावीद आणि त्याचा मुलगा राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपापली कर्तव्ये पार पाडा.
5 पापल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हाला आपापसात सहकार्य करता येईल.
6 ल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही यथासांग पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेमार्फत दिल्या आहेत.”
7 वल्हांडणासाठी योशीयाने 30,000 शेरडे मेंढरे यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांना दिली. या खेरीज 3000 बैल दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
8 या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांना, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी 2,600 शेरडे मेंढरे आणि 300 बैल एवढे पशू वल्हांडणाचे बळी म्हणून याजकांना दिले.
9 कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना 500 कोकरे मेंढरे व 500 बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती.
10 वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.
11 वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. लेवींनी त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. याजकांनी हे रक्त वेदीवर शिंपडले.
12 त्यांन मग हे पशू परमेश्वराला होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्राच सांगितल्याप्रमाणे करायचा होता.
13 लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यांत, हंड्यांत आणि कढ्यांमध्ये त्यांनी ही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांना ती नेऊन दिली.
14 हे काम उरकल्यावर लेवींना स्वत:साठी आणि अहरोनचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
15 आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दावीदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदुथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपल्या जागा सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
16 तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
17 सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
18 शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलमधून आलेले लोक आणि यरुशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.
19 नयोशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
20 योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढण्यासाठी सैन्यासह चालून आला. योशीया त्याला लढाईसाठी सामोरा गेला.
21 पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्याला कळवले की, “राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.”
22 पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मागिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.
23 या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.”
24 तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरुशलेमला नेले. यरुशलेममध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना फार दु:ख झाले. 25यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते गाण्याचा पायंडाच पडला आहे. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.26-27आपल्या कारकिर्दीत योशीयाने ज्या इतर गोष्टी केल्या त्या ‘इस्राएल आणि यहूदा राजांचा इतिहास’ या पुस्तकात अथपासून इतीपर्यंत नोंदवलेल्या आहेत. त्याची परमेश्वरावरची निष्ठा आणि त्याचे आज्ञापालन याविषयी त्यात लिहिले आहे.

2-Chronicles 35:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×