परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस. माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही. प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते. कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.
परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस. त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतातआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्याढगासारखे आहे.
परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.