English Bible Languages

Indian Language Bible Word Collections
Psalms 119:86

Psalms Chapters

Psalms 119 Verses

Books

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Psalms Chapters

Psalms 119 Verses

1 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
2 जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत. ते परमेश्वराच्या आज्ञा मानापासून पाळतात.
3 ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत. ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
5 परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
6 तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
7 मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
8 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन. तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
9 तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो मला तुझे नियम शिकव.
13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते.
15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पध्दत आचरेन.
16 मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.
17 माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
18 परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
19 मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
20 तू घेतलेल्या निर्णयांचा मला सतत अभ्यास करावासा वाटतो.
21 परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
22 मला शरम वाटू देऊ नकोस. मला लाज आणू नकोस. मी तुझा करार पाळला आहे.
23 नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
24 तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे. तो मला चांगला उपदेश करतो.
25 मी लवकरच मरणार आहे. परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे.
26 मी तुला माझ्या आयुष्या बद्दल सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस. आता मला तुझे नियम शिकव.
27 परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर. तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेस त्या मला अभ्यासू दे.
28 मी खिन्न आणि दमलेलो आहे. आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव.
29 परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस. मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.
30 परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.
31 मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो. परमेश्वरा, माझी निराशा करु नकोस.
32 मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन. परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात.
33 परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन.
34 मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन.
35 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो.
36 श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर.
37 परमेश्वरा, कवडी मोलाच्या गोष्टीं कडे मला बघू देऊ नकोस. मला तुझ्या मार्गाने जीवन जगायला मदत कर.
38 तू जे कबूल केलेस ते तुझ्या सेवकासाठी कर. मग लोक तुला मान देतील.
39 परमेश्वरा, मला ज्या शरमेची भीती वाटते ती घेऊन जा. तुझे शहाणपणाचे निर्णय चांगले आहेत.
40 बघ, मला तुझ्या आज्ञा आवडतात. मला चांगले वागव आणि मला जगू दे.
41 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव. कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव.
42 त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल. परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे.
43 मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे. परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
44 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.
45 म्हणजे मी मुक्त होईन का? कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.
46 मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत.
47 मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.
48 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो. मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन.
49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो. आणि तू माझे सांत्वन केलेस. तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो. परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
57 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे, असा निर्णय मी घेतला आहे.
58 परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. वचन दिल्याप्रमाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग.
59 मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो.
60 अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.
61 वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले. पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.
62 मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
63 जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे. जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.
64 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथ्वी व्यापून टाकते. मला तुझे नियम शिकव.
65 परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास. तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होतेस त्याच गोष्टी केल्यास.
66 परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे. माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे.
67 दु:ख सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
68 देवा, तू चांगला आहेस आणि तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव.
69 जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोट सांगितलं पण परमेश्वरा, मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.
70 ते लोक फार मूर्ख आहेत पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.
71 मी दु:ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
72 परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
73 परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
74 परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
75 परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
76 आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर. तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर.
77 परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे. मला तुझी शिकवण मनापासून आवडते.
78 जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
79 तुझे भक्त माझ्याकडे परत येतील अशी मी आशा करतो म्हणजे मग ते तुझ्या कराराचा अभ्यास करु शकतील.
80 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे म्हणजे मला लाज वाटणार नाही.
81 परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
82 तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत. परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?
83 मी जरी उकिरड्यावरच्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो तरी मी तुझे नियम विसरणार नाही.
84 मी किती काळ जगणार आहे? परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात. त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?
85 काही गार्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.
86 परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.
87 त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला. पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.
88 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव आणि मला जगू दे. तू जे सांगशील ते मी करेन.
89 परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
90 तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा. तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
91 तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते.
92 जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
93 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.
94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर. का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
95 दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला. पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.
96 तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात.
97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात. तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे. कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात.
106 तुझे नियम चांगले आहेत. मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
107 परमेश्वरा, मी खूप काळ द:ुख भोगले आहे. कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव.
109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.
112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.
113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल. मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या पत्येकाला तू परत पाठव. का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे. म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
124 मी तुझा सेवक आहे. मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.
128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. मला खोटी शिकवण आवडत नाही.
129 परमेश्वरा, तुझा करार अद्भुत आहे म्हणूनच मी तो पाळतो.
130 जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते. तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.
131 परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
132 देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
133 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
134 परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
135 परमेश्वरा, तुझ्या सेवकाचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव.
136 लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
137 परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुझे नियम योग्य आहेत.
138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत. पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
143 माझ्यावर खूप संकटे आली आणि वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
144 तुझा करार नेहमीच चांगला असतो. तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
145 मी अगदी मनापासून तुला बोलावतो परमेश्वरा, मला उत्तर दे मी तुझ्या आज्ञा पाळीन.
146 परमेश्वरा, मी तुला बोलावतो माझा उध्दार करआणि मी तुझा करार पाळीन.
147 तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो. तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो.
148 तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो.
149 तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
150 लोक माझ्याविरुध्द वाईट योजना आखीत आहेत ते लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत.
151 परमेश्वरा, तू माझ्या खूप जवळ आहेस आणि तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
152 मी खूप पूर्वी तुझ्या करारावरुन शिकलो की तुझी शिकवण सदैव राहाणार आहे.
153 परमेश्वरा, माझे दु:ख बघ आणि माझी सुटका कर. मी तुझी शिकवण विसरलो नाही.
154 परमेश्वरा, माझ्यासाठी माझी लढाई लढ. तू वचन दिल्याप्रमाणे मला जगू दे.
155 दुष्ट लोक जिंकणार नाहीत कारण ते तुझे नियम पाळत नाहीत.
156 परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस. तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
157 मला दु:ख देण्याचा प्रयत्न करणारे अनेक शत्रू मला आहेत पण मी तुझ्या कराराप्रमाणे वागणे सोडले नाही.
158 मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
159 बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.
160 परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.
161 शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
162 परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो, नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.
163 मला खोटे आवडत नाही. मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते.
164 मी दिवसातून सात वेळा तुझ्या चांगल्या नियमांसाठी मी तुझी स्तुती करतो.
165 जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
166 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे. मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.
167 मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडतात.
168 मी तुझा करार आणि तुझ्या आज्ञा पाळल्या. परमेश्वरा, मी जे काही केले ते सर्व तुला माहीत आहे.
169 परमेश्वरा, माझे आनंदी गाणे ऐक. तू कबूल केल्याप्रमाणे मला शहाणा कर.
170 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. वचन दिल्याप्रमाणे माझा उध्दार कर.
171 तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.
172 तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर आणि मला माझे गाणे म्हणून दे. परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत.
173 परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोच कारण मी तुझ्या आज्ञांप्रमाणे वागणे पसंत केले.
174 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते. पण तुझी शिकवण मला आनंद देते.
175 परमेश्वरा, मला जगू दे आणि तुझे गुणगात करु दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करु दे.
176 मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो. परमेश्वरा, मला शोधाला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
×

Alert

×