English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Numbers Chapters

Numbers 26 Verses

1 मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला:
2 तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”
3 त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले,
4 “वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.
5 जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.) ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
6 हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
7 रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.
8 पल्लूचा मुलगा अलियाब.
9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
10 त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.
11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.
12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे नमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ.
13 जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ.
14 ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.
15 गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी: सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ.
16 आजनीचे आजनी कूळ. एरीचे एरी कूळ.
17 अरोदचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
18 गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.
19 [This verse may not be a part of this translation]
20 [This verse may not be a part of this translation]
21 पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ.
22 ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.
23 इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी: तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
24 याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.
25 इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.
26 जुबुलूनच्या कुळातील कुळे: सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
27 जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.
28 योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
29 मनश्शेच्या कुळातील कुळे: माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ.
30 गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ.
31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ. शेखेमाचे शेखेमी कूळ.
32 शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ.
33 हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.
35 एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती: शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी.
37 ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.
38 बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती: बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
39 शफूफामचे शफूफामी कूळ. हुफामचे हुफामी कूळ.
40 बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ.
41 ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.
42 दानच्या कुळातील कुळे होती: शूहामचे शूहामी कूळ. हे कूळे दानच्या कुळातील होते.
43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.
44 आशेरच्या कुळातील कुळे होती: इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.
45 बरीयाच्या कुळातील कुळे होती: हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ.
46 (आशेरला सेरा नावाची मुलगी होती)
47 ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.
48 नफतालीच्या कुळातील कुळे होती: यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.
49 येसेरचे येसेरी कूळ व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.
50 ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.
51 म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
52 परमेश्वर मोशेला म्हणाला,
53 “जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.
54 मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल.
55 पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.
56 प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.
57 त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती: गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ.
58 लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती: लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ. अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
59 अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
61 पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.
62 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.
63 मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते.
64 खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
65 कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.
×

Alert

×