मिर्याम व अहरोन मोशेविरुद्ध बोलू लागले. त्यांनी त्याच्यावर टीका केली कारण त्याने एका इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले. मोशेने त्या इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले ते योग्य केले नाही असे त्यांना वाटले.
ते स्वत:शीच म्हणाले, “परमेश्वराने लोकांशी बोलण्यासाठी मोशेचा उपयोग केला. पण मोशे काय असा एकच नव्हे. परमेश्वर आमच्याद्वारेही बोलला आहे!” परमेश्वराने हे ऐकले.
तेव्हा परमेश्वर आला आणि मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांच्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा मोशे, अहरोन व मिर्याम दर्शनमंडपापाशी गेले.
मी त्याच्याशी बोलताना समोरासमोर बोलतो. मी त्याच्याशी दाखल्याने किंवा गुप्त अर्थ असलेल्या गोष्टींनी बोलत नाही-त्याला समजाव्यात अशा गोष्टी मी त्याला स्पष्टपणे दाखवितो. आणि मोशे परमेश्वराचे रुप स्पष्टपणे बघतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली?”
परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.