गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लढाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.
उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा. परमेश्वराचे लोकाहो. तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा. परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला. इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.
अमाले कच्या डोॅगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले. हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले माखीरच्या वंशातूनही सेनापती आले. जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले.
इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता. तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते. ते खोऱ्यात पायी चालत आले. रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत.
मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ बसून का राहिलात? शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला. पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.
गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले. आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात? आशेर लोक समुद्रकाठी, सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले.
सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?”
“माझी खात्री आहे. त्यांनी युध्द जिंकले. आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत. प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत. बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली. होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे, पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.”
परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोतर सामर्ध्यवान होवोत! अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.