Indian Language Bible Word Collections
Job 11:12
Job Chapters
Job 11 Verses
Books
Old Testament
New Testament
Bible Versions
English
Tamil
Hebrew
Greek
Malayalam
Hindi
Telugu
Kannada
Gujarati
Punjabi
Urdu
Bengali
Oriya
Marathi
Assamese
Books
Old Testament
New Testament
Job Chapters
Job 11 Verses
1
नंतर नामाथीच्या सोफरने ईयोबला उत्तर दिले:तो म्हणाला,
2
“शब्दांच्या या भाडिमाराला उत्तर द्यायलाच हवे. ह्या सगळ्या बोलण्याने ईयोब बरोबर ठरतो का? नाही.
3
ईयोब, आमच्याजवळ तुला द्यायला उत्तर नाही असे तुला वाटते का? तू देवाला हसशील तेव्हा तुला कुणी ताकीद देणार नाही असे तुला वाटते का?
4
ईयोब तू देवाला म्हणतोस, ‘मी जे बोलतो ते बरोबर आहे आणि मी शुध्द पवित्र आहे हे तू बघू शकतोस.’
5
ईयोब देवाने तुला उत्तर द्यावे आणि तू चुकतो आहेस हे तुला सांगावे असे मला वाटते.
6
देव तुला ज्ञानाचे रहस्य सांगू शकेल. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे तो तुला सांगेल. तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी देव करत नाही हे तू समजून घे.
7
“ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
8
त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे, तू काय करु शकतोस? ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?
9
देव पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.
10
“देवाने जर तुला कैद करुन न्यायालयात न्यायचे ठरवले, तर त्याला कोणीही अडवू शकत नाही.
11
कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे. तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात.
12
रानटी गाढव माणसाला जन्म देऊ शकत नाही. आणि मूर्ख माणूस कधीही शहाणा होऊ शकणार नाही.
13
“पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.
14
तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
15
तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील. तू न भीता सर्व सामर्थानिशी उभा राहू शकशील.
16
नंतर तू तुझे दु:ख विसरशील. तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
17
भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्याप्रमाणे चमकेल.
18
नंतर तुला सुरक्षित वाटेल. कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.
19
तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील.
20
वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील. परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”