कोणीही दुसऱ्याबद्दल खरे सांगत नाही. लोक न्यायालयात एकमेकंाविरूध्द फिर्याद गुदरतात आणि ते दावा जिंकण्यासाठी खोट्या वादांवर विसंबतात. ते एकमेकांबद्दल खोटे सांगतात. ते संकटांनी घेरलेले आहेत. ते पापाला जन्म देतात.
विषारी सर्पाच्या अंड्यातून विषारी सर्पच निघतो. तसेच ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाचे अंडे तुम्ही खाल्ले तर तुम्ही मराल आणि ते तुम्ही फोडले तर त्यातून सर्पच निघेल. लोक खोट्या गोष्टी सांगतात-ह्या खोट्या गोष्टी कोळंयाच्या जाळ्याप्रमाणे असतात.
त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही. तुम्ही तुमचे अंग त्याने झाकू शकत नाही. काही लोक दुष्कृत्ये करतात आणि दुसऱ्यांना इजा करण्यासाठीच आपल्या हाताचा उपयोग करतात.
आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात.
त्यांना शांतीचा मार्ग माहीत नसतो. त्यांच्या जीवनात अजिबात चांगुलपणा नसतो. त्यांचे मार्ग प्रामाणिक नसतात त्याच्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कोणालाही कधीही जीवनात शांतता लाभणार नाही.
सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे. आमच्याभोवती फक्त अंधार आहे. म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे. आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो. पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे.
आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत. आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो. दिवसासुध्दा आम्ही पाहू शकत नाही. दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
आम्ही सर्व, फार दु:खी आहोत. आम्ही दु:खाने पारवे व अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो. लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत. पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही. आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत. पण तारण अजून खूप दूर आहे.
आम्ही पाप केले आणि परमेश्वराविरूध्द गेलो. आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आमी त्याला सोडले. आम्ही देवाच्याविरूध्द दुष्ट बेत केले. आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.
परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा राहून लोकांना मदत करताना दिसला नाही. म्हणून परमेश्वराने स्वत:चे सामर्थ्य आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
परमेश्वर त्याच्या शत्रूवर रागावला आहे. म्हणून परमेश्वर त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिक्षा करील. परमेश्वर त्याच्या शत्रूंवर रागावला असल्यामुळे सर्व देशांतील लोकांना तो शिक्षा करील. त्यांच्या पात्रतेप्रमाणे तो त्यांना शिक्षा देईल.
नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील. पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील. देवाने सोडलेल्या झंझावातामुळे, वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांबरोबर एक करार करीन. मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, असे मी तुम्हाला वचन देतो. ते पिढ्यान् पिढ्या तुमच्याबरोबर राहतील ते आताही तुमच्याबरोबर असतील आणि चिरकाल तुमच्याबरोबर राहतील.”