ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता.
तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही.”
परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “त्या मुलाबद्दल बिलकूल चिंता करु नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करु नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले; त्याचा मृत्यू आपल्याला पाहवणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली, व हंबरडा फोडून रडू लागली.
देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला; आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारुन म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस; तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे
मग देवाने हागारेला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली, नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले.
तेव्हा आता देवासमोर येथे मला वचन दे की तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या संतानाशी न्यायनीतीने वागशील असा माझ्याशी करार कर; तू माझ्याशी व ज्या ह्या माझ्या देशात तू राहिलास त्या देशाशी दयाळूपणे राहशील, असे वचन दे, तसेच मी जसा तुझ्याशी दयाळूपणाने वागलो तसाच तूही माझ्याशी दयाळूपणाने राहशील असे वचन तू मला दे, व असा करार तू माझ्याशी कर.”
अब्राहामाने बैर - शेबा येथे एक विशेष प्रकारचे झाड लावले, आणि त्याच जागी, जो निरंतर राहतो अशा परमेश्वराची प्रार्थना केली; आणि तो बराच काळ पलिष्ट्यांच्या देशात राहिला.