त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले. त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले. मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले. आता, इस्राएलच्या डोंगरातून त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.
पण त्या वेलीला मुळापासून उपटून फेकून देण्यात आले. पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तिची फळे वाळली. मजबूत फांद्या मोडल्या, आणि त्या फांद्या आगीत टाकल्या गेल्या.
आता ती द्राक्षवेल, रुक्ष व निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा व फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी व राजदंड उरला नाही.’ हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”