English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Deuteronomy Chapters

Deuteronomy 33 Verses

1 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला.
2 “परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला दहाहजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिक त्याच्याबरोबर होते.
3 परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरंच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
4 मोशेने आम्हाला नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबच्या लोकांची ठेव आहे.
5 इस्राएलचे सर्व लोक आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
6 “रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
7 मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करुन दे. त्याला शक्तिशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्याला साहाय्यकारी हो.”
8 लेवींविषयी मोशे असे म्हणाला, “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
9 हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
10 ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
11 परमेश्वरा, जे जे लेवींचे आहे त्याला आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्वीकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करुन टाक.”
12 बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.”
13 योसेफा विषयी तो म्हणाला, “योसेफच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो.
15 टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
16 धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफला मिळो. योसेफची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडुपांतून, परमेश्वराचा दुवा त्याला मिळो.
17 योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे. त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करुन त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
19 ते लोकांना आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
20 गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरुन बसतो. आणि सावजावर हल्ला करुन त्याच्या चिंधड्या करतो.”
21 स्वत:साठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वत:ला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.’
22 दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
23 नफताली विषयी मोशेने सांगितले, नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी “भरभरुन मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
24 आशेर विषयी मोशने असे सांगीतले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
25 तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
26 “हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
27 देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.
28 “म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
29 इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!”
×

Alert

×