दोषी व्यक्ति फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्याला फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्हा्याच्या प्रमाणात असावी.
“दोन भाऊ एकत्र राहात असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.
त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलमध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.
तर सर्वांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.’
म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. देव तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात प्रवेश केल्यावर तुम्ही हे अंमलात आणा. इतर शत्रूंपासून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला विसावा दिल्यावर अमालेकांचा न विसरता समाचार घ्या.