English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Acts Chapters

Acts 9 Verses

1 शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला.
2 शौलाने त्याला दिमिष्क येथील सभास्थानातील यहूदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिष्क येथील रिव्रस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करुन यरुशलेमला आणले असते.
3 मग शौल दिमिष्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला.
4 शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”
5 शौल म्हणाला, “प्रभु तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे.
6 आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.”
7 जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही.
8 शौल जमिनीवरुन उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते, त्यांनी त्याचा हात धरुन त्याला दिमिष्क शहरात नेले.
9 [This verse may not be a part of this translation]
10 दिमष्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभु त्याच्याशी एका दृष्टान्तात बोलला: तो म्हणाला, “हनन्या!” हनन्याने उत्तर दिले, “मी आहे, प्रभु!”
11 प्रभु हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्तयावर जा. तेथे यहूदाचे घर शोध व तार्ससहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तिबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे.
12 शौलाने दृष्टान्त पाहिला आहे. त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवीत आहे, असे त्याला दिसले. व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्याला दिसले.”
13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभु मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम येथील तुइया संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
15 परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे.
16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभु येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले, येशूने मला पाठविले यासाठी की, तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.”
18 लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.
19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करु लागला. “यूशू हा देवाचा पुत्र आहे.”
21 ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, “यरुशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वांचा नाश करु पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम येथील प्रमुख याजकासमोर उभे करणार आहे.”
22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच रिव्रस्त आहे. आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की, दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
23 बऱ्याच दिवसांनंतर यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
24 यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
25 एक रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकुसावरुन रात्रीच्या वेळी खाली सोडली.
26 नंतर शौल यरुशलेमला गेला. तेथील विश्वास णाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे.
27 परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्याला घेऊन प्रषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांना सांगितली.
28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरुशलेममध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभुची सुवार्ता सांगू लागला.
29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे. पण ते त्याला मारण्याचा प्रयत्न करीत होते.
30 जेव्हा बंधुजनांना (विश्वासणाऱ्यांना) हे कळाले तेव्हा त्यांनी त्याला कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्याला तार्सज्ञ नगराला पाठविले.
31 मंडळी जेथे कोठे ती होती-यहूदीया, गालीली, शोमरोन, तेथे त्यांना शांति लाभली. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने हा गट अधिक शक्तिशाली बनला. आपल्या वागणुकीने विश्वासणाऱ्यांनी दाखवून दिले की, ते प्रभूचा आदर करतात. या कारणामुळे विश्वासणाऱ्यांचा परिवार मोठा होत गेला.
32 पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते, त्यांना भेटला.
33 लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.
34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास. येशू रिव्रस्त तुला बरे करीत आहे. ऊठ, आपले अंथरुण नीट कर!” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला.
35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता. तेव्हा तबिथा आजारी पडली व मेली. त्यांनी (लोकांनी) तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले.
38 यापो येथीला अनुयायांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे,) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विंनति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”
39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले.
40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.
41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलाविले. त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती!
42 यापोमधील सर्व लोकांना हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
43 पेत्र यापोमध्ये बरेच दिवस राहिला. तो शिमोन नावाच्या चांभाराकडे राहिला.
×

Alert

×