“मी एक यहूदी आहे. आणि किलिकीया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला. परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो, आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालीएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेल आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो.
याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजन साक्ष देतील. त्यांच्याकडून दिमिष्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली. आणि तेथे ह्या मार्गांचे (ख्रिस्ती) जे लोक होते, त्यांना कैदी म्हणून यरुशलेमास घेऊन येणार होतो, यसाठी की त्यांना शिक्षा व्हावी.
तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या (वाडवडिलांच्या) देवाने तुला निवडले आहे, यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी. त्या धार्मिकाला तू पहावेस. आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत.
आणि जेव्हा तुझा साक्षीदार स्तेफन याचे रक्त सांडले तेव्हा तेथे उभा राहून मी त्याला संमति दर्शवीत होतो. आणि ज्या लोकांनी स्तेफनाला मारले त्यांचे कपडे मी राखीत होतो.’
येथपर्यंत यहूदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अशा मनुष्याल पृथ्वीवरुन नाहीसे केले पाहिजे! तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही!’
परंतु जेव्हा पौलाला चाबकाने मारण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चाबकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?”
जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. व पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.
दुसऱ्या दिवशी यहूदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवीत होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली, मग त्याने पौलाला आणून त्यांच्यापुढे उभे केले.