1
|
ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू एकावेस म्हणून तुला बोलावत आहेत. |
2
|
ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात, तिथे उभे आहेत. |
3
|
ते शहराच्या दरवाजाशी आहेत. ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत. |
4
|
ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे. मी सगळ्या लोकांना बोलावत आहे. |
5
|
तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका. मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका. |
6
|
लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो. |
7
|
माझे शब्द खरे आहेत. मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो. |
8
|
मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत. माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही. |
9
|
जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात. ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो. |
10
|
माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे. |
11
|
ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.” |
12
|
“मी ज्ञान आहे. मी चांगल्या न्यायाने जगते. तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता. |
13
|
जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते. |
14
|
परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते. मी समजूतदारपणा आणि शक्ती देते. |
15
|
राजे राज्य करताना माझा उपयोग करतात. राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात. |
16
|
प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो. |
17
|
मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते. |
18
|
माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत. मी खरी संपत्ती आणि यश देते. |
19
|
मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात. |
20
|
मी लोकांना योग्य मार्गावर आणते. मी तयांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते. |
21
|
जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन. |
22
|
खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने प्रथम माझीच निर्मिती केली. |
23
|
आरंभीला मला निर्माण केले गेले. जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले. |
24
|
महासागराच्या आधी माझा जन्म झाला. पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते. |
25
|
पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला. डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला. |
26
|
परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले. शेतांच्या आधी माझा जन्म झाला. देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता. |
27
|
परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते. |
28
|
परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला. आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते. |
29
|
परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते. |
30
|
एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते. |
31
|
त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता. तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता. |
32
|
“मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला तर तुम्हीही आनंदी व्हाल. |
33
|
माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा. ऐकायला नकार देऊ नका. |
34
|
जो माझे ऐकतो तो सुखी होतो. तो रोज माझ्या दारावर पाहारा देतो. तो माझ्या दाराजवळ थांबतो. |
35
|
ज्या माणसाला मी सापडते. त्याला जीवन सापडते. त्याला परमेश्वराकडून चांगल्या गोष्टी मिळतील. |
36
|
पण जो माझ्याविरुध्द पाप करतो तो स्वत:लाच इजा करुन घेतो. जे लोक माझा तिरस्कार करतात ते मरणाला कवटाळतात.” |
Proverbs 8:25 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...