1
|
मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला: |
2
|
तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.” |
3
|
त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले, |
4
|
“वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे. |
5
|
जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.)ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ. |
6
|
हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ. |
7
|
रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते. |
9
|
अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला. |
10
|
त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता. |
11
|
परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत. |
12
|
शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेनमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ. |
13
|
जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ. |
14
|
ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते. |
15
|
गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी:सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ. |
16
|
आजनीचे आजनी कूळ. एरीचे एरी कूळ. |
17
|
अरोदचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ. |
18
|
गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते. |
19
|
यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ. (यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.) |
21
|
पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ. |
22
|
ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते. |
23
|
इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ. |
24
|
याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ. |
25
|
इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते. |
26
|
जुबुलूनच्या कुळातील कुळे:सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ. |
27
|
जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते. |
28
|
योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली. |
29
|
मनश्शेच्या कुळातील कुळे:माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ. |
30
|
गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ. |
31
|
अस्रियेलाचे अस्रियेली कूळ. शेखेमाचे शेखेमी कूळ. |
32
|
शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ. |
33
|
हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. |
34
|
ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते. |
35
|
एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती:शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ. |
36
|
एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी. |
37
|
ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते. |
38
|
बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ. |
39
|
शफूफामचे शफूफामी कूळ. हुफामचे हुफामी कूळ. |
40
|
बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ. |
41
|
ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती. |
42
|
दानच्या कुळातील कुळे होती:शूहामचे शूहामी कूळ.हे कूळे दानच्या कुळातील होते. |
43
|
शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती. |
44
|
आशेरच्या कुळातील कुळे होती:इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ. |
45
|
बरीयाच्या कुळातील कुळे होती:हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ. |
46
|
(आशेरला सेरा नावाची मुलगी होती) |
47
|
ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती. |
48
|
नफतालीच्या कुळातील कुळे होती:यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ. |
49
|
येसेरचे येसेरी कूळ व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ. |
50
|
ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती. |
51
|
म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती. |
52
|
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
53
|
“जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल. |
54
|
मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल. |
55
|
पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल. |
56
|
प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील. |
57
|
त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती:गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ. |
58
|
लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती:लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ.अम्राम कोहाथच्या कुळातील होता. |
59
|
अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम. |
60
|
नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते. |
61
|
पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली. |
62
|
लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही. |
63
|
मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते. |
64
|
खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. |
65
|
कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा. |
Numbers 26:46 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...