1
|
इस्राएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले |
2
|
इस्राएलचे लोक युध्दाला तयार झालेते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले. परमेश्वराचा धन्यवाद करा. |
3
|
राजांनो ऐका, लक्ष द्या अधिपतींनो, मी परमेश्वराचे, इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे गीत स्वत: गाईन. त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन. |
4
|
परमेश्वरा. पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास, अदोम भूमीतून तू कूच केलेस. तेव्हा पृथ्वी थरारली. आकाशाने वर्षाव केला ढगातून वृष्टी झाली. |
5
|
पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे. सीनाय पर्वताच्या देवापुढे. इस्राएलांचा देव परमेश्वरापुढे. |
6
|
अनाथचा मुलगा शमगार याच्या आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले. |
7
|
दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंतइस्राएलमध्ये सैनिक नव्हते. नावालाही सैनिक नव्हते. |
8
|
नगराच्या वेशीपाशी युध्द करायला परमेश्वराने नवे नेते निवडले.तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती. |
9
|
ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे. परमेश्वराचा धन्यवाद करा. |
10
|
पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो, खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या. |
11
|
गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लढाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात. |
12
|
ऊठ दबोरा, जागी हो, गाणे म्हण! बाराका ऊठ, अबीनवामाच्या मुला शत्रूंना बंदिवान कर. |
13
|
उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा. परमेश्वराचे लोकाहो. तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा. परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला. इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले. |
14
|
अमाले कच्या डोॅगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले. हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले माखीरच्या वंशातूनही सेनापती आले. जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले. |
15
|
इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता. तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते. ते खोऱ्यात पायी चालत आले. रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत. |
16
|
मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळबसून का राहिलात? शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला. पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले. |
17
|
गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले. आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात? आशेर लोक समुद्रकाठी, सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले. |
18
|
पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची पर्वा न करता पराक्रम केला. |
19
|
कनानी राजेही लढाईत उतरले. कनानच्या राजांनी तनाखमध्ये, मगिद्दोच्या जलाशयाजवळ लढाई केली. पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत. |
20
|
स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले. |
21
|
किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या सैन्याला वाहून नेले. चला, प्राणपणाने झुंजू या. |
22
|
घो्यांचे खूर जमिनीवर आपटले. सीसराच्या दणकट घोड्यांना पळता भुई थोडी झाली. |
23
|
परमेश्वराच्या दूताने सांगितले, “मेरोज शहराला, त्यातील रहिवाश्यांना शाप द्या, ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला धावून आले नाहीत.” |
24
|
याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल. |
25
|
सीसराने पाणी मागितले याएलने त्याला दूध दिले राजाला साजेशा पात्रात तिने त्याला साय दिली |
26
|
मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली. कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली. सीसरावर तिचा प्रयोग केला. त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला. |
27
|
याएलच्या पायांमध्ये तो कोसळला. तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी तो कोसळला तिथेच तो पडला. तेथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला. |
28
|
सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?” |
29
|
तिच्या चाणाक्ष दासीने, होय दासीने, तिला उत्तर दिले. |
30
|
“माझी खात्री आहे. त्यांनी युध्द जिंकले. आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत. प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत. बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली. होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे, पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.” |
31
|
परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोतर सामर्ध्यवान होवोत!अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली. |
Judges 5:27 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...