1
|
नंतर ईयोबने उत्तर दिले:“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल. |
3
|
माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते. |
4
|
त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते. देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत. |
5
|
काहीही वाईट घडलेले नसते तेव्हा तुझे शब्द सहजपणे बोलता येतात. रानटी गाढवसुध्दा खायला गवत असले की कसली तक्रार करीत नाही. आणि गायसुध्दा तिला तिचा चारा मिळाला की मुकाट असते. |
6
|
अन्न मिठाशिवाय चांगले लागत नाही आणि अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव नसते. |
7
|
मी त्याला स्पर्शही करु शकत नाही. तसल्या बेचव अन्नाची मला शिसारी येते. तुमचे शब्दही मला आता तसेच वाटायला लागले आहेत. |
8
|
“मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते. मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते. |
9
|
मला देवाच्या हातून मरण हवे. त्याने मला चिरडून टाकावे. |
10
|
आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल, एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन, या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही. |
11
|
“माझी शक्ती आता संपली आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा माझ्यात नाही. माझे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे ज्याच्यासाठी धीर धरावा असे काही कारण उरलेले नाही. |
12
|
मी पाषाणासारखा शक्तीमान नाही. माझे शरीर पितळेचे बनलेले नाही. |
13
|
आता स्वत:ला सावरायची ताकद माझ्यात नाही. का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे. |
14
|
“एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे. |
15
|
पण मित्रांनो, तुम्ही मात्र निष्ठावान नाही. मी तुमच्यावर विसंबून राहू शकत नाही. जे कधी वाहतात, कधी वाहात नाहीत अशा ओढ्यासारखे तुम्ही आहात. ओढे जेव्हा हिमाने आणि |
16
|
वितळणाऱ्या बफर्ाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात. |
17
|
जेव्हा हवामान उष्ण आणि कोरडे होते तेव्हा पाणी वाहात नाही आणि ओढे नाहीसे होतात. |
18
|
व्यापारी त्याची नागमोडी वळणे शोधत वाळवंटात जातात परंतु ते दिसेनासे झालेले असतात. |
19
|
तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले. शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला. |
20
|
त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती परंतु त्यांची निराशा झाली. |
21
|
आता तुम्ही त्या ओढ्यासारखे आहात. तुम्ही माझ्या संकटांना पाहून घाबरता. |
22
|
मी तुम्हाला मदत मागितली का? नाही. पण तुम्ही आपणहून मला उपदेश केला. |
23
|
‘माझे शत्रूपासून रक्षण करा! क्रूर लोकांपासून मला वाचवा!’ असे मी तुम्हाला म्हटले का? |
24
|
“आता तुम्ही मला शिकवा म्हणजे मी शांत होईन. माझी काय चूक झाली ते मला दाखवा. |
25
|
प्रामाणिक शब्द नेहमीच सामर्थ्यशाली असतात. परंतु तुमचे वादविवाद काहीच सिध्द करु शकत नाहीत. |
26
|
माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का? तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का? |
27
|
पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात. तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल. |
28
|
पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही. |
29
|
तुम्ही आता तुमचा विचार बदला. अन्यायी होऊ नका. पुन्हा विचार करा. मी काहीही चूक केलेली नाही. |
30
|
मी खोटे बोलत नाही आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.” |
Job 6:24 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...