1
|
नंतर नामाथीच्या सोफरने ईयोबला उत्तर दिले:तो म्हणाला, |
2
|
“शब्दांच्या या भाडिमाराला उत्तर द्यायलाच हवे. ह्या सगळ्या बोलण्याने ईयोब बरोबर ठरतो का? नाही. |
3
|
ईयोब, आमच्याजवळ तुला द्यायला उत्तर नाही असे तुला वाटते का? तू देवाला हसशील तेव्हा तुला कुणी ताकीद देणार नाही असे तुला वाटते का? |
4
|
ईयोब तू देवाला म्हणतोस, ‘मी जे बोलतो ते बरोबर आहे आणि मी शुध्द पवित्र आहे हे तू बघू शकतोस.’ |
5
|
ईयोब देवाने तुला उत्तर द्यावे आणि तू चुकतो आहेस हे तुला सांगावे असे मला वाटते. |
6
|
देव तुला ज्ञानाचे रहस्य सांगू शकेल. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे तो तुला सांगेल. तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी देव करत नाही हे तू समजून घे. |
7
|
“ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे. |
8
|
त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे, तू काय करु शकतोस? ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस? |
9
|
देव पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे. |
10
|
“देवाने जर तुला कैद करुन न्यायालयात न्यायचे ठरवले, तर त्याला कोणीही अडवू शकत नाही. |
11
|
कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे. तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात. |
12
|
रानटी गाढव माणसाला जन्म देऊ शकत नाही. आणि मूर्ख माणूस कधीही शहाणा होऊ शकणार नाही. |
13
|
“पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस. |
14
|
तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस. |
15
|
तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील. तू न भीता सर्व सामर्थानिशी उभा राहू शकशील. |
16
|
नंतर तू तुझे दु:ख विसरशील. तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल. |
17
|
भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्याप्रमाणे चमकेल. |
18
|
नंतर तुला सुरक्षित वाटेल. कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल. |
19
|
तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील. |
20
|
वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील. परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.” |
Job 11:7 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...