1
|
मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्याओता.” |
2
|
पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होतेआणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले. |
3
|
दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातीलप्रत्येक जीवधारी प्राणी मेले, |
4
|
तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्यावझरे रक्तमय झाले. |
5
|
मग मी पाण्याच्या देवदूताला हेबोलताना ऐकले:“केवळ तूच एक आहेस, जो तू आहेस आणि जो तू होतास. तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस. |
6
|
लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले. तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.कारण ते याच पात्रतेचे आहेत.” |
7
|
त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,“होय, प्रभु देवा सर्वसमर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.” |
8
|
चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती. |
9
|
भयंकरअशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पणलोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले. |
10
|
पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळेलोक त्यांच्या जिभा चावत होते. |
11
|
लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आलेहोते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले. |
12
|
सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठीरस्ता तयार झाला. |
13
|
तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेरआले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले. |
14
|
हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मेआहेत. ते चमत्कार करातात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशीलढाईसाठी एकत्र जमवतात. |
15
|
“पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील. आणि आपलेकपडे तयार ठेवतो तो धन्य.” |
16
|
मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोननावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले. |
17
|
मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला,“हे पूर्ण झाले आहे.” |
18
|
मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवरअसल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता. |
19
|
महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्टझाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला. |
20
|
प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले. |
21
|
लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येकगारा 10 0 पौंडवजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण हीपीडा खरोखरच महाभयंकर होती. |
Revelation 16:20 Oriya Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...