Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 15 Verses

Bible Versions

Books

Revelation Chapters

Revelation 15 Verses

1 मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडाआणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
2 मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्यानावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती.
3 त्यांनीदेवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान आणि अदभुत गोष्टी करतोस. राष्ट्रांच्या राजा, तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
4 हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील. फक्त तूच पवित्र आहेस सर्व लोक येऊन तुझीउपासना करतील कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
5 त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप)पाहिले. मंदिर उघडे होते.
6 आणि सात पीडा आणणारे सात देवदूतमंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्याहोत्या.
7 मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या जो देव अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्या रागानेत्या वाट्या भरल्या.
8 आणि देवाच्या तेजामधून व पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले. आणि कोणीही सातदेवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करु शकले नाही.देवाच्या रागने वाट्या भरल्या

Revelation 15 Verses

Revelation 15 Chapter Verses Oriya Language Bible Words display

COMING SOON ...

×

Alert

×