1
|
परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या. |
2
|
सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे. |
3
|
सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे. |
4
|
बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास. |
5
|
परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा. |
6
|
मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. |
7
|
देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले. |
8
|
परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस. |
9
|
त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. |
Psalms 99:5 Oriya Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...