1
|
परमेश्वरा, मला वाचव! सर्व चांगले लोक आता गेले आहेत. आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही. |
2
|
लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो. |
3
|
परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओठ कापून टाकले पाहिजेत परमेश्वराने मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या जभा छाटून टाकल्या पाहिजेत. |
4
|
ते लोक म्हणतात, “आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही.” |
5
|
परंतु परमेश्वर म्हणतो, “वाईट लोक गरीबांकडून वस्तू चोरतात ते अगतिक लोकांकडून वस्तू काढून घेतात. परंतु आता मी तिथे उभा राहून त्या गरीब असहाय्य लोकांची बाजू घेईन आणि त्यांचे रक्षण करीन.” |
6
|
परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत. ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. |
7
|
परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे. त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर. |
8
|
ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत. ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्तअसतात. |
Psalms 12:8 Oriya Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...