1
|
शलमोनाचे सर्वांत सुंदर गीत |
2
|
चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. |
3
|
तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात. |
4
|
मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात. |
5
|
यरुशलेमच्या मुलींनो, मी काळी आणि सुंदर आहे. मी तेमान आणि शलमोनाच्या तंबूंसारखी काळी आहे. |
6
|
मी किती काळी आहे, सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका. माझे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली. त्यामुळे मला स्वत:चीकाळजी घेता आली नाही. |
7
|
मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते. मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस? तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस? मी तुझ्याबरोबर यायला हवे. नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन |
8
|
तू खूप सुंदर स्त्री आहेस. काय करायचे ते तुला नक्कीच माहीत आहे. मेंढ्यांच्या मागे मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूंजवळ खाऊ घाल. |
9
|
फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडीजशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस.त्या घोडड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत. |
10
|
हे तुझ्यासाठी केलेले अलंकार: डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे. |
12
|
माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो. |
13
|
माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे |
14
|
माझा प्रियकर एन - गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे. |
15
|
प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत. |
16
|
प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे. |
17
|
आपल्या घराच्या तुळ्या गंधसरुच्या लाकडाच्या आहेत. छताचे वासे देवदारुच्या लाकडाची आहे. |
Song-of-Solomon 1:3 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...