दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते, त्यांच्याकडे धूपप्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. ह्या प्रार्थना देवाच्या पवित्र पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पणसिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले.
पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा वअग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले.
दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले.आणि एक तृतीयांश समुद्राचे रक्त झाले.
तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारानद्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला.
चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा सूर्याच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. चंद्राच्या एक तृतीयांशभागावर व ताऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा एक तृतीयांश भाग काळा झाला. दिवसाचा एकतृतीयांश काळा भाग झाला. रात्रीचा एक तृतीयांश भाग काळा झाला.
मी पाहत असताना, आकाशात उंचावर मी गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, “संकट! संकट!संकट, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट तीन देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल.”