1
|
मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल. |
2
|
विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो. |
3
|
देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला. आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या. |
4
|
मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले. |
5
|
देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका. |
6
|
या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली. |
7
|
परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो. |
8
|
परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल. |
9
|
परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुराक्षित अशी दुसरी जागा नाही. |
10
|
शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील. |
11
|
मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन. |
12
|
जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर, |
13
|
त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत. त्याने खोटे बोलायला नको. |
14
|
वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा. |
15
|
परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो. |
16
|
परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो. |
17
|
परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल. |
18
|
काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो. |
19
|
चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील. परंतु परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो. |
20
|
परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही. |
21
|
परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. |
22
|
परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही. |
Psalms 34:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...