1
|
परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात. |
2
|
तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. |
3
|
घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील. |
4
|
परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल. |
5
|
परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेममध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो. |
6
|
आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे. |
Psalms 128:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...