English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Mark Chapters

Mark 15 Verses

1 पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.
2 पिलाताने त्याला विचारले, ‘तू यहूद्यांचा राजा आहेस काय?’येशूने उत्तर दिले, ‘तू म्हणतोस तसेच.’
3 मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले.
4 मग पिलाताने त्याला पुन्हा प्रश्न विचारला, ‘तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते किती तरी गोष्टीविषयी तुझ्यावर आरोप ठेवीत आहेत!’
5 पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.
6 वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्याला पिलात रिवाजा प्रमाणे लोकांसाठी सोडत असे.
7 बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. या लोकांनी दंगलीमध्ये खून केला होता.
8 लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले.
9 पिलाताने विचारले, ‘तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?’
10 पिलात असे म्हणाला कारण त्याला माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते.
11 परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांना चिथावले.
12 परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, ‘तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?’
13 ते पुन्हा मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
14 पिलाताने पुन्हा विचारले, ‘का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?’ ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
15 पिलाताला लोकांना खूष करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
16 शिपायांनी येशूला राज्यपलाच्या राजवाड्यात, ज्याला प्रयटोरियम म्हणतात तेथे नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलाविली.
17 त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला.
18 ते त्याला मुजरा करु लागले आणि म्हणू लागले, ‘यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.’
19 त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले.
20 त्यांनी त्याची थटृा केल्यावर त्याच्या अंगावरुन जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वत:चे कपडे त्याला घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले.
21 वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो अलेक्सांद्र व रुफ यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
22 आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे ‘कवटीची जागा’ म्हटलेल्या ठिकाणी आणले.
23 त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला परंतु त्याने तो घेतला नाही.
24 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.
25 त्यांनी त्याला वधस्तंभांवर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वजले होते.
26 आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, ‘यहूद्याचा राजा’ असा लिहिला होता.
27 (27-28) त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.
29 जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, ‘अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!
30 वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वत:चा बचाव कर.’
31 तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थटृा केली आणि एकमेकाला म्हणाले, ‘त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही!
32 या मशीहाला, इस्त्राएलाचा राजा रिव्रस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विशवास ठेवू’ आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
33 दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.
34 मग तीन वाजता रिव्रस्त मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, ‘एलोई, एलोई, लमा सबखथनी,’ म्हणजे, ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?’
35 जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ‘ऐका, तो एलीयाला बोलवीत आहे.’
36 एक जण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडूवून भरला. काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, ‘थांबा! एलीया येऊन त्याला खाली उतरवितो की काय हे आपण पाहू.’
37 मग मोठ्याने आरोळी मारुन येशूने प्राण सोडला.
38 तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
39 येशूच्या पुढे उभे अलेल्या सेनाधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, ‘खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.’
40 तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरुन पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया व सलोमी या होत्या.
41 येशू जेव्हा गालीलात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेपर्यंत आलेल्या इतर अनेक स्रियाही होत्या.
42 त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.
43 योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
44 येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्याना विचारले. येशूला मरुन बराच वेळ झाला की काय?
45 सेनाधिकाऱ्याकडून त्याने अहवाल ऐकला, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.
46 मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले. आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्याला तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर धोंड बसविली.
47 येशूला कोठे ठेवले हे मरीया मग्दालिया आणि योसेची आई मरीया हे सर्व बघत होत्या येशूला कुठे ठेवले, हे त्यांनी पाहिले.
×

Alert

×