(4-6) “काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, ते तुम्ही खाऊ नयेत, उंट, शाफान-सशासारखा खडकात राहणारा एक प्राणी, ससा हे असे प्राणी आहेत, ते तुम्हांकरिता अशुद्ध प्राणी आहेत.
(10-11) जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टिने ते अयोग्य आहेत. ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये.
(26-27) ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत; चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
“त्यांच्यापैकी कोणी मरुन एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, तो पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करुन ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्ही ही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!