English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 35 Verses

1 यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, यिर्मयाला देवाचा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. परमेश्वराकडून आलेला संदेश असा होता.
2 “यिर्मया, रेखाब्यांकडे जा त्यांना देवाच्या मंदिरातील एका बाजूच्या खोलीत बोलाव. त्यांना पिण्यास मद्य दे.”
3 म्हणून मी (यिर्मया) याजनाकडे गेलो. याजना हा यिर्मयाचामुलगा होता आणि यिर्मया हबसिन्याचा मुलगा होता. मी याजनाच्या सर्व भावांना व मुलांना आणि
4 रेखाबी कुटुंबीयांना एकत्र केले आणि त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले. आम्ही सर्व हानानच्या मुलांच्या खोलीत गेलो. हानान हा इग्दल्याचा मुलगा होता व तो ‘देवाचा माणूस’ होता. ही खोली यहूदाच्या राजपुत्रांच्या खोली शेजारी होती. द्वारपाळ मासेया याच्या खोलीच्या वर ही खोली होती. मंदिराचा द्वारपाळ मासेया हा शल्लूमचा मुलगा होता.
5 नंतर मी (यिर्मयाने) त्या रेखाबे कुटुंबीयांसमोर मद्य भरलेले वाडगे व पेले ठेवले. मी म्हणालो, “थोडे मद्य प्या”
6 पण ते म्हणाले, “आम्ही कधीच मद्य पीत नाही कारण आमचे पूर्वज रेखाब यांचा मुलगा योनादाब यांनी आम्हाला तशी आज्ञा दिली आहे ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी कधीही दारु घेऊ नये’ असे त्यांनी सांगितले आहे.
7 शिवाय त्यांनी असेही सांगितले आहे की तुम्ही कधीही घरे बांधू नका. बी पेरु नका वा द्राक्षमळे लावू नका. ह्यातील कोणतीच गोष्ट तुम्ही कधीही करु नका. तुम्ही फक्त तंबूतच राहिले पाहिजे. तुम्ही असे केलेत तरच स्थलांतर करीत तुम्ही ज्या जागी आला आहात, तेथे दीर्घ काळ राहाल.’
8 आमचे पूर्वज योनादाब यांनी घालून दिलेले निर्बंध आम्ही रेखाबे घराण्यातील लोक पाळत आलो आहोत. आम्ही कधीच मद्य घेत नाही. आमच्या बायका वा मुलेमुलीही मद्य घेत नाहीत.
9 आम्ही आम्हाला राहण्यासाठी घरे बांधीत नाही. आमची स्वत:च्या मालकीची शेते वा द्राक्षमळे नाहीत. आम्ही कधीही शेती करीत नाही.
10 आम्ही फक्त तंबूत राहत आलो आणि आमचे पूर्वज योनादाब यांनी सांगितल्याप्रमाणे वागत आलो.
11 पण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदावर हल्ला केल्यावर. आम्हाला यरुशलेमला जावेच लागले. आम्ही एकमेकांना म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला गेलेच पाहिजे. तरच खास्द्यांच्या आणि अराम्यांच्या सैन्यापासून आपला बचाव होईल.’ म्हणून आम्ही यरुशलेममध्ये राहिलो.”
12 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
13 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदातील व यरुशलेममधील लोकांना हा संदेश ऐकव. तुम्ही लोकांनी धडा शिकावा व माझ्या संदेशाचे पालन करावे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
14 “रेखाबचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना मद्य ‘पिऊ नका’ असे सांगितले आणि त्यांनी त्याचे ऐकले. आजपर्यंत त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. त्यांनी मद्य घेतले नाही. पण मी परमेश्वराने स्वत: तुम्हाला पुन्हा पुन्हा संदेश दिले, तरी यहूदाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐकले नाही.
15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सेवक-संदेष्टे पाठविले. मी त्यांना तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाठविले. ते संदेष्टे म्हणाले ‘इस्राएल आणि यहूदा येथील प्रत्येक माणसाने दुष्कृत्ये करणे बंद करावे. तुम्ही चांगलेच असले पाहिजे. दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजा वा सेवा करु नका. तुम्ही माझे ऐकलेत, तर तुमच्या पूर्वजांना व तुम्हाला दिलेल्या देशात तुम्ही राहाल.’ पण तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही.
16 योनादाबच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या. पण यहूदाच्या लोकांनी माझेही ऐकले नाही.”
17 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी सांगतो, यहूदाचे आणि यरुशलेमचे वाईट होईल. लवकरच मी त्यांचे वाईट करीन. मी त्या लोकांशी बोललो, पण त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या, पण त्यांनी ओ दिली नाही.”
18 नंतर यिर्मया रेखाब कुटुंबीयांना म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो ‘तुम्ही तुमचे पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा पाळल्यात. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागलात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केलीत.
19 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, रेखाबचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”
×

Alert

×