Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 3 Verses

Bible Versions

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 3 Verses

1 “एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते. मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही. जर तो माणूस त्या बाईकडे परत गेलातर तो देश ‘भ्रष्ट’ होतो. यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.” हा परमेश्वराचा संदेश होता.
2 यहूदा, टेकड्यांच्या उजाड माथ्यांकडे पाहा. अशी एक तरी जागा आहे का की जेथे तू तूझ्या प्रियकराबरोबर (खोट्या देवांबरोबर) समागम केला नाहीस? वाळवंटात वाट पाहाणाऱ्या अरबांप्रमाणे, तू प्रियकराची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसलीस. तू देश ‘भ्रष्ट’ केलास. कसा? तू खूप वाईट गोष्टी केल्यास. तू माझा विश्वासघात केलास.
4 ण आता तू मला ‘पिता’ म्हणत आहेस. तू म्हणालीस, ‘मी लहान असल्यापासून तू माझा मित्र आहेस.’
6 योशीया यहुदावर राज्य करीत असताना, परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, इस्राएलने केलेली दुष्कृत्ये तू पाहिलीस ना? तिने माझा कसा विश्वासघात केले ते तू पाहिलेस. तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तींबरोबर व्यभिचार करुन पाप केले.
7 मी स्वत:शीच म्हणालो, ‘ही दुष्कृत्ये करुन झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.’ पण ती माझ्याकडे परत आली नाही. इस्राएलने काय केले हे इस्राएलच्या विश्वासघातकी बहिणीने यहूदाने पाहिले.
8 इस्राएल विश्वासघातकी आहे आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे. तिने व्यभिचाराचे पाप केले म्हणून मी तिला घटस्फोट दिला हे तिला कळले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही. यहूदाला भीती वाटली नाही. यहूदाने सुध्दा बाहेर जाऊन वारांगनेप्रमाणे व्यवहार केला.
9 आपण वारांगनेप्रमाणे वागत आहोत ह्याची यहूदाला पर्वा नव्हती म्हणून तिने तिचा देश ‘भ्रष्ट’ केला. दगड आणि लाकूड यांपासून तयार केलेल्या मूर्तींची पूजा करुन तिने व्यभिचाराचे पाप केले.
10 इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही. परत येण्याचे तिने फक्त ढोंग केले.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
11 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल माझ्याशी निष्ठावंत नाही. पण विश्वासघातकी यहूदापेक्षा तिच्याकडे सबळ सबबी होत्या.
12 यिर्मया, उत्तरेकडे बघ आणि संदेश सांग:‘इस्राएलच्या बेइमान लोकांनो, परत या’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता. ‘मी तुमच्यावर संतापायचे सोडून देईने. मी दयाळू आहे. ‘हा परमेश्वराचा संदेश होता. ‘मी कायमचा तुमच्यावर रागावणार नाही.’
13 तुम्ही पाप केले आहे एवढे तुम्हाला समजले पाहिजे. तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरुद्ध गेलात तेच तुमचे पाप आहे. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रातील मूर्तींना प्रत्येक हिरव्या झाडाखाली पूजले. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
14 “तुम्ही लोक विश्वासघातकी आहात. पण माझ्याकडे परत या.” हा परमेश्वराचा संदेश होता.“मी तुमचा प्रभू आहे मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे घेईन आणि तुम्हाला सियोनला आणीन.
15 मग मी तुम्हाला नवे मेंढपाळ (शासनकर्ते) देईन. ते माझ्याशी निष्ठावान असतील. ते ज्ञान आणि समज ह्यांच्या सहाय्याने तुम्हाला मार्गदर्शन करतील.
16 त्या काळात, देशात तुमच्यापैकी बरेचजण असतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.“त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, ‘परमेश्वराच्या कराराचा कोश आमच्याजवळ असण्याचे दिवस आम्हाला आठवतात.’ येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत.
17 त्या वेळेला यरुशलेम नगरीला ‘परमेश्वराचे सिंहासन’ म्हटले जाईल. परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरुशलेममध्ये एकत्र येतील. ह्या पुढे ते त्यांच्या दुरग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.
18 त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
19 “मी, परमेश्वर, स्वत:शी म्हणालो, ‘माझ्या स्वत:च्या मुलांप्रमाणे तुम्हाला वागवावे असे मला वाटते. इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा, तुम्हाला, सुंदर व आल्हाददायक भूमी द्यावी अशी माझी इच्छा आहे. ‘मला वाटले की तुम्ही मला ‘पिता.’ म्हणाल व नेहमीच मला अनुसरल.
20 पण तुम्ही पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे आहात. इस्राएलच्या घराण्यातील लोकांनो, तुम्ही माझा विश्वासघात करीत आहात.” हा देवाचा संदेश होता.
21 उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. इस्राएले लोक रडत आहेत. ते दयेसाठी याचना करीत आहेत. ते फार पापी झाले. ते त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.
22 परमेश्वर पुढे म्हणाल, “इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्याशी विश्वसघात करता. पण माझ्याकडे परत या. माझ्याकडे परत या. जरी तुम्ही विश्वासघातकी असलात तरी मी तुम्हाला क्षमा करीन.”पण लोकांनी म्हणावे, “हो! आम्ही तुझ्याकडे येऊ तूच परमेश्वर आमचा देव आहेस!”
23 टेकड्यांवर मूर्तीची पूजा करणे मूर्खपणाचे आहे. डोंगरावर मोठ्या, दिखाऊ मेजवान्या करणे चूक आहे. इस्राएलचे पापविमोचन नक्कीच आपल्या परमेश्वर देवाकडून येईल.
24 त्या भयानक खोट्या देवाने बआल देवताने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्व काही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली गिळली. आमच्या तारुण्यापासून हे घडले. त्या भयानक खोट्या देवाने आमच्या वडिलांच्या मेंढ्या आणि गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे घेतली.
25 लज्जेचे आपण अंथरुण करु या आणि पांघरुणाने आपण शरीर झाकतो तशी लाज आपण पांघरु या. आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध जाऊन पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी पाप केले. आम्ही लहान असल्यापासून परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

Jeremiah 3:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×