1
|
वडिलाकडून,देवाने निवडलेल्या बाईनाव तिच्या मुलांना,सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीति करतो, आणि तुमच्यावर प्रीति करणारा मी एकटाच नाही, तरज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजणसुद्धा प्रीति करतात. |
2
|
या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, तेआमच्यामध्ये अनंतकाळपर्यंत राहील. |
3
|
देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांतिही सत्यात व प्रीतित आपणबरोबर राहोत. |
4
|
पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फारआनंद झाला. |
5
|
आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवीआज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुलादेण्यात आलेली होती, |
6
|
आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासूनऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे. |
7
|
येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास नठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय. |
8
|
सावध असा!यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे. |
9
|
जो मनुष्य ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालत नाही, तर तिचे उल्लंघन करतो, त्याला देव मिळाला नाही. जोकोणी ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याला देवपिता व पुत्र असे दोन्ही मिळाले आहेत. |
10
|
जर एखादा मनुष्यतुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्यालासलामही करु नका. |
11
|
कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो. |
12
|
मला जरी अनेक गोष्टी तुम्हांला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हांला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तरत्याऐवजी तुम्हांला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळेपरिपूर्ण होईल. |
13
|
देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीचीमुले तुम्हांला सलाम सांगतात. |
2-John 1:12 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...