1
|
पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांच्या द्वारे देव जो पिता त्यामध्ये तसेच प्रभु येशू ख्रिस्तामध्ये दृढ असलेल्या थेस्सलनीकाच्या मंडळीस, देवाची कृपा व शांति लाभो. |
2
|
आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करुन तुम्ही सर्वांसाठी देवाचे आभार मानतो. |
3
|
आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो. |
4
|
माझ्या बंधूनो, देवाने प्रीतित केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे. |
5
|
कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते. |
6
|
आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला, पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात. |
7
|
त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदोनियात व अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात |
8
|
कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही. |
9
|
कारण ते स्वत:च आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात. |
10
|
आणि आता ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात. तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो. |
1-Thessalonians 1:9 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...