लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती.
या स्तंभांवरुन देवदाराच्या तुळ्या घातलेल्या असून त्यावर छत म्हणून देवदाराच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
न्यायनिवाडा करण्यासाठीही त्याने एक दालन बांधून घेतले. त्याला त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या राजाची मुलगी म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवताल्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडील सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट होते पण ते मरण पावले होते. हिराम हा एक अनुभवी आणि कसबी तांबट होता. म्हणून राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्वीकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने तितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
यानंतर हिरामने पंच धातूचा एक गोल हौद केला. याला त्याने “समुद्र” असे नाव दिले. याचा परिघ पंचेचाळीस फूट होता. या काठापासून त्या काठापर्यंत त्याची लांबी पंधरा फूट होती आणि खोली साडेसात फूट.
या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्या खाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करुन घेतल्या होत्या.
बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दाक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्र्चिमेला होती.
पत्रे आणि चौकट यांच्यावर पितळी सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
प्रत्येक पालखीला पितळी धुऱ्यांवर पितळेची चार चार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यांनाही फुलांचे सुबक काम केलेले होते.
बैठकीला वरच्या बाजूला चौकट होती. बैठकीपासून ती अठरा इंच वर होती. घंगाळाचे वाटोळे तोंड सत्तावीस इंच व्यासाचे होते. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकट मात्र गोल नसून चौकोनी होती.
पालखीची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीवकाम पितळेत केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यात कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
(40-45) याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळी बनवली. शलमोनाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या त्यांची यादी पुढीलप्रमाणे:दोन स्तंभ स्तंभांच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या या दोन जाळ्यांची चारशे डाळिंबांच्या दोन-दोन रांगा, रांगाळासाहित पालख्या दहा पायातळी बारा बैल असेला विशाल हौद याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे.राजाच्या इच्छेखातर हिरामने हे केले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.
(46-47) या सगाळ्यासाठी किती पितळ लागले ते राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व चीजवस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही. सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.
परमेश्वाच्या मंदिराचे हे काम शलमोनाने स्वत:च्या पसंतीप्रमाणे करवून घेतले. मग आपले वडील दावीद यांनी या हेतून राखून ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढल्या. त्या सर्व मंदिरात आणल्या. परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यात ही सोन्यारुप्याची चीजवस्तू जमा केली.