“परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे.
त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या दिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.”
हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.”
माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”
(10-11) हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची झाडे दिली. आणि शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 1,20,000 बुशेल गहू आणि 1,20,000 गंलन निर्भेळ तेल दिले.
अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.