English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

1 Kings Chapters

1 Kings 13 Verses

1 परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या माणसाला) यहूदाहून बथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
2 परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती त्याप्रमाणे तो म्हणाला,“हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे. ‘दावीदाच्या कुळात योशीया नावाचा मुलगा जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आत्ता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
3 हे निश्रित घडेल याचीही संदेष्ट्याने लोकांना चुणूक दाखवली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
4 यराबाम राजाने संदेष्ट्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेलमध्ये ऐकले. तेव्हा वेदीवरील आपला हात उचलून राजाने त्या माणसाकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” पण हे बोलत असताना राजाचाच हात लूळा पडला. त्याला तो हलवता येईना
5 नसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. संदेष्ट्याच्या तोंडून देवच बोलत होता याचा तो पुरावाच होता.
6 तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.”तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
7 राजा त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझ्या बरोबर घरी चल. काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
8 पण हा संदेष्ट्या म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
9 काहीही न खाण्याणियाबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही अशीही त्याची आज्ञा आहे.”
10 त्या प्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
11 बेथेल नगरात एक वृध्द संदेष्टा राहात होता. त्याच्या मुलांनी त्याला या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. यराबामला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
12 तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “कोणत्या रस्तयाने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडीलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
13 त्या वृध्द संदेष्ट्याने मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरु निघाला.
14 हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एका वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्याला विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा माणूस?” संदेष्टा यावर त्याने होकार दिला.
15 तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
16 पण हा देवाचा माणूस म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही
17 ‘तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”‘
18 यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणी पुढे त्याने खोटेच सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
19 तेव्हा तो देवाचा माणूस वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
20 ते मेजावर बसलेले असताना परमेश्वर वृध्द संदेष्ट्याशी बोलला.
21 वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या माणासाला म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
22 येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
23 या देवाच्या माणासाचे खाणे पिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा माणूस) निघाला.
24 परतीच्या वाटेवर एका सिहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला मारुन टाकले. देवाच्या माणसाचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
25 इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
26 वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या माणसाला फसवन आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा माणूस. त्याने परमेश्वराचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्याला मारायला सिंहाची योजना केली. असे होणार असे परमेश्वराने सांगितले होते.”
27 मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
28 तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
29 वृध्द संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
30 त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
31 मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी याच्याशेजारीच विसावू द्या.
32 परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
33 राजा यराबममध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या माणसांची तो पुरोहित म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्याला पुरोहित बनता येई.
34 या पापामुळेच त्याच्या राज्याचा सर्वनाश ओढवला.
×

Alert

×