परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,“डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या अंत:करणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”यशया 64:4
परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे. कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो.
मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते.