Indian Language Bible Word Collections
Numbers 34:1
Numbers Chapters
Numbers 34 Verses
Books
Old Testament
New Testament
Bible Versions
English
Tamil
Hebrew
Greek
Malayalam
Hindi
Telugu
Kannada
Gujarati
Punjabi
Urdu
Bengali
Oriya
Marathi
Assamese
Books
Old Testament
New Testament
Numbers Chapters
Numbers 34 Verses
1
परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
2
“इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
3
दक्षिणे कडे अदोमजवळच्या त्सीन वाळवंटाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.
4
तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करुन ती त्सीन वाळवंटातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
5
असमोनहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि भूमध्यसमुद्रात तिची समाप्ती होईल.
6
तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे भूमध्यसमुद्र (महासमुद्र).
7
तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये).
8
होर पर्वतावरुन ती लेबो-हमासला जाईल व तेथून सदादला.
9
नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.
10
तुमची पूर्व सीमा एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
11
शफामपासून ती अईनच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा गालीली तलावाजवळच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
12
आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.”
13
तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना या आज्ञा दिल्या, “तुम्हाला हा प्रदेश मिळेल. तुम्ही नऊ कुळात आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळात जमिनीची विभागणी करण्यासाठी चिठ्ठ्या टाकाल.
14
रऊबेन आणि गादची कुळे आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांनी आधीच त्यांची जमीन घेतली आहे.
15
त्या अडीच कुळानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडची जागा घेतली आहे.”
16
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
17
“जमिनीची विभागणी करण्यासाठी तुला या माणसांची मदत होईल: याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
18
आणि सर्व कुळांचे प्रमुख. प्रत्येक कुळाचा एक प्रमुख असेल. ते लोक जमिनीची विभागणी करतील.
19
प्रमुखांची ही नावे आहेत: यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
20
शिमोनेच्या कुटुंबातील अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
21
बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद.
22
दानी कुटुंबातील यागलीचा मुलगा बुक्की.
23
योसेफच्या वंशातील मनश्शेच्या कुटुंबातील एफोदचा मुलगा हन्नीएल.
24
एफ्राईम कुटुंबातील शिफटानचा मुलगा कमुवेल.
25
जबुलून वंशातील पर्नाकचा मुलगा अलीसाफान.
26
इस्साखार वंशातील अज्जानचा मुलगा पलटीयेल.
27
आशेरी वंशातील शलोमीचा मुलगा अहीहूद.
28
आणि नप्ताली वंशातील अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.”
29
परमेश्वराने कनानच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली.