तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग “सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस. तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस. समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस. ‘प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.
“सोर, तू स्वत:ला इतकी सुंदर समजतेस, की जणू काही सौंदर्यांची खाणच! तुझ्या शहराच्या सीमेवर भूमध्य समुद्र आहे. तुझ्या जहाजाप्रमाणे, तुझ्या कर्त्यांनी, तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
गबालची वडील व कुशाल माणसे तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.’
“पारसी, लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते. तेच तुझे लढवय्ये वीर होते. आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले.
तुझ्याजवळ पुष्कळ चांगल्या वस्तू असल्याने अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला. ते तुझ्या मालाच्या मोबदल्यात पाचू. जांभळे कापड, सुंदर वीणकाम, तागाचे उत्तम कापड, पोवळे आणि माणके देत.
दिमिष्क तुझा चांगला ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तम वस्तूंसाठी त्याने तुझ्याबरोबर व्यापार केला. तुझ्या मालाच्या मोबदल्यात तो तुला हेल्बोनचा द्राक्षरस व पांढरी लोकर देत.
येथील व्यापारी उंची वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, वेगवेगळ्या रंगाचे गालिचे, घट्ट विणीचे दोर व गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत.
“आणि तुझी सर्व संपत्ती समुद्रात सांडले. तुझी संपत्ती, विकायचा व विकत घेतलेला माल सर्व समुद्रात पडेल. तुझी सर्व माणसे. नावाडी, खलाशी आणि डांबराने भेगा बुजविणारे कारागीर समुद्रात पडतील. तुझ्या शहरातील सर्व व्यापारी आणि सैनिक समुद्रात बुडतील. तुझ्या नाशाच्या दिवशीच हे घडले.
दुसऱ्या राष्ट्रांतील व्यापारी धक्का बसल्यामुळे आपापासात कुजबुज करत आहेत. तुझ्या बाबतीत जे काही घडले, त्यामुळे लोक भयभीत होतील. का? कारण तुझा शेवट झाला. तुझा शेवट झाला”