English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

1 Kings Chapters

1 Kings 7 Verses

1 राजा शलमोनाने स्वत:साठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली.
2 लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती.
3 या स्तंभांवरुन देवदाराच्या तुळ्या घातलेल्या असून त्यावर छत म्हणून देवदाराच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
4 भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
5 दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
6 शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती.
7 न्यायनिवाडा करण्यासाठीही त्याने एक दालन बांधून घेतले. त्याला त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
8 याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या राजाची मुलगी म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
9 या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवताल्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
10 पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी 15 फूट व इतरांची बारा फूट होती.
11 त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
12 महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या भोवताली भिंत होती. तिला दगडांच्या तीन ओळी आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ होती.
13 राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या माणसाला निरोप पाठवून यरुशलेम येथे बोलावून घेतले.
14 हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडील सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट होते पण ते मरण पावले होते. हिराम हा एक अनुभवी आणि कसबी तांबट होता. म्हणून राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्वीकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने तितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
15 हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. प्रत्येक स्तंभ सत्तावीस फूट उंचीचा आणि अठरा फूट परिघाचा होता. हे स्तंभ पोकळ असून पत्र्याची जाडी तीन इंच होती.
16 शिवाय त्याने साडेसात फूट उंचीचे दोन पितळी महिरपदार खांबही बांधले.
17 या खांबाच्या घुमट्यांना आच्छादायला म्हणून दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली.
18 मग त्याने पितळेचे, डाळिबांच्या आकाराचे शोभिवंत कळस केले. घुमट्यांच्या जाळड्यांवर या कळसांच्या दोन रांगा बसवल्या.
19 साडेसात फूट उंचीचे जे स्तंभ होते त्याच्या घुमट्या फुलाच्या आकाराच्या होत्या.
20 या घुमट्या स्तंभांवर बसवलेल्या होत्या. परडीच्या आकाराच्या जाळीवर त्या बसवलेल्या होत्या. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने वीस डाळिंबे लावली होती.
21 हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दाक्षिणेकडील खांबाला याखीन आणि उत्तरे कडील खांबाला बवाज असे नाव ठेवले.
22 फुलाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभांचे काम संपले.
23 यानंतर हिरामने पंच धातूचा एक गोल हौद केला. याला त्याने “समुद्र” असे नाव दिले. याचा परिघ पंचेचाळीस फूट होता. या काठापासून त्या काठापर्यंत त्याची लांबी पंधरा फूट होती आणि खोली साडेसात फूट.
24 या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्या खाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करुन घेतल्या होत्या.
25 बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दाक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्र्चिमेला होती.
26 हौदाची जाडी तीन इंच रुंदीची होती. आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा फुलासारखी उमललेली होती. यात अकरा हजार गंलन पाणी मावत असे.
27 मग हिरामने दहा पितळी पालख्या केल्या. प्रत्येक पालखी सहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि साडे चार फूट उंच होती.
28 चौकटीत बसवलेल्या चौकोनी पत्र्यांनी या पालख्या केल्या होत्या.
29 पत्रे आणि चौकट यांच्यावर पितळी सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
30 प्रत्येक पालखीला पितळी धुऱ्यांवर पितळेची चार चार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यांनाही फुलांचे सुबक काम केलेले होते.
31 बैठकीला वरच्या बाजूला चौकट होती. बैठकीपासून ती अठरा इंच वर होती. घंगाळाचे वाटोळे तोंड सत्तावीस इंच व्यासाचे होते. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकट मात्र गोल नसून चौकोनी होती.
32 सांगाड्याच्या खालची चार चाके सत्तावीस इंच व्यासाची होती. आणि चाकांच्या धुऱ्या पालखीबरोबरच घडलेल्या, एकसंध होत्या.
33 रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्व काही ओतीव पितळेचे होते.
34 प्रत्येक पालखीच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
35 प्रत्येक पालखीला वरुन एक पितळेची पट्टी होती. तीही अंगचीच होती.
36 पालखीची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीवकाम पितळेत केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यात कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
37 हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारख्या एक अशा दहा पितळी पालख्या घडवल्या. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे त्या तंतोतंत एकसारख्या होत्या.
38 हिरामने अशीच दहा गंगाळी केली. ती या दहा पालख्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळ सहाफुटी होते. त्यात दोनशेतीस गलन पाणी मावू शकत असे.
39 मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणपूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला हौदाची योजना केली.
40 [This verse may not be a part of this translation]
41 [This verse may not be a part of this translation]
42 [This verse may not be a part of this translation]
43 [This verse may not be a part of this translation]
44 [This verse may not be a part of this translation]
45 [This verse may not be a part of this translation]
46 [This verse may not be a part of this translation]
47 [This verse may not be a part of this translation]
48 [This verse may not be a part of this translation]
49 [This verse may not be a part of this translation]
50 [This verse may not be a part of this translation]
51 परमेश्वाच्या मंदिराचे हे काम शलमोनाने स्वत:च्या पसंतीप्रमाणे करवून घेतले. मग आपले वडील दावीद यांनी या हेतून राखून ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढल्या. त्या सर्व मंदिरात आणल्या. परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यात ही सोन्यारुप्याची चीजवस्तू जमा केली.
×

Alert

×