English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Ruth Chapters

Ruth 4 Verses

1 बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.
2 बवाजने मग काही साक्षीदांरानाही गोळा केले. गावातील दहा ज्येष्ठ मंडळींना बोलावले. त्यानाही बसवून घेतले.
3 मग बवाज त्या नातेवाईकाला म्हणाला, “हे पाहा,नामी मवाबच्या डोंगराळ प्रदेशातून आली आहे. अलीमलेखच्या मालकीची जमीन तिने विकायला काढली आहे.
4 हे पंच आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या साक्षीने तुला हे मी सांगायचे ठरवले आहे. ही जमीन तुला परत विकत घ्यायची असल्यास तू घेऊ शकतोस. पण नसेल तर तसे मला सांग ही जमीन परत विकत घेण्याचा तुझ्यानंतर माझाच हक्क आहे. तेव्हा तू ती विकत घेणार नसलास तर मी घेईन.”
5 पूढे बवाज म्हणाला, “नामीची जमीन घेतलीस तर मवाबहून आलेली विधवा रूथसुद्धा तुझी पत्नी होईल. तिला मुल झाले की जमीन त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे जमीनीचा ताबा तिच्या मृत पतीच्याच कुटुंबात राहील.”
6 यावर तो आप्त म्हणाला, “मी काही ती जमीन घेत नाही. मीच खरे तर ती घ्यायला हवी, पण मला ते शक्य नाही कारण त्यामुळे कदाचित् मी माझ्या स्वत:च्या जमिनीला मुकेन.तेव्हा तू ती खुशाल घेऊ शकतोस.”
7 (पूर्वी इसाएलमध्ये गहांण टाकलेल्या जमिनीची ती सोडवून घेण्याचे व्यवहार करताना खरेदीचा पुरावा म्हणून तो माणूस पायातला जोडा काढून दूसऱ्याला देत असे.)
8 त्यानसार तो नातलग म्हणाला, “जमीन तूच विकत घे” आणि आपला जोडा काढून त्याने बवाजला दिला.
9 बवाज मग तेथील सर्व श्रेष्ठवडीलधा-या साक्षीदारांना म्हणाला, “आज तुमच्या साक्षीने मी अलीमलेख, खिल्योन, महलोन यांच्या मालकीचे सर्व काही नामीकडून विकत घेत आहे.
10 रूथलाही बायको म्हणून मी विकत घेतो. म्हणजे या मृत व्यक्तींची मिळकत त्यांच्याच घराण्यात राहिल. त्यांचे नाव त्यांच्या कुळातून, वतनातून पुसले जाणार नाही. तुम्ही या सगव्व्याला साक्षी आहात.”
11 अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले,परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो
12 तामारने यहूदापासून पेरेसला जन्म दिला त्याचे कूळ थोर झालेतशीच तुलाही परमेश्वराच्या कृपेने रूथपासून भरपूर संतती होवो. त्याच्यासारखेच तुझे घराणे मोठे होवो.
13 त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केले. तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला.
14 गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा.दिला तो इस्राएलमध्ये कीर्तिवंत होईल.
15 तुमचे तो पुनरूज्जीवन करेल वृध्दापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे. सात मुलांपेक्षाही तिची थोरवी आधिक आहे.
16 नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले.
17 शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले. बायका म्हणाल्या, “नामीलाच हा मुलगा झाला आहे.” मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद इशायचा पिता झाला. इशाय राजा दावीदचा पिता झाला.
18 पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे:हस्तोनचा पिता पेरेस.
19 हेस्तोन रामचा पिता. राम अम्मीनादाबचा पिता
20 अम्मीनादाब नहशोनचा पिता नहशोन सल्मोनचा पिता.
21 सल्मोन बवाजचा पिता बवाज ओबेदचा पिता
22 ओबेद इशायचा पिता इशाय दावीदचा पिता.
×

Alert

×